साडे चार एकर शिवारात साकारली शरद पवार यांची प्रतिमा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा नुकताच 80 वाढदिवस साजरा करण्यात आला. त्या निमित्ताने पवारांच्या एका चाहत्याने साडे चार एकर शिवारात त्यांची भव्य प्रतिमा साकारली आहे.

धाराशिवमधील निपाणी येतील मंगेश निपाणीकर या कलाकाराने शरद पवारांना अनोख्या शुभेच्छा दिल्या आहेत. 600 किलो बियाणे, 200 किलो अळीव, 300 किलो मेथी, 40 किलो गहू, आणि वीस किलो ज्वारी, हरभरा वापरून मंगेश यांनी शिवारात शरद पवारांची भव्य ग्रास पेटिंग साकारली आहे. शेतात योग्य ठिकाणी पेरणी करून योग्य सिंचन करून मंगेशने ही प्रतिमा साकारली आहे. ही प्रतिमा साकारायला मंगेश यांना 15 दिवसांचा अवधी लागला.

ही कलाकृती पाहण्यासाठी लोकांनी एकच गर्दी केली आहे. दूर दूरहून लोक ही प्रतिकृती पाहण्यासाठी गर्दी करत असून सोशल मीडियाव त्याचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहे. तसेच कलाकार मंगेश निपाणीकर यांची चहुबाजूने प्रशंसा होत आहे.