त्यांना कशाकशातून बाहेर काढलं ते सांगितलं तर फिरणं मुश्किल होईल, शरद पवार यांचा धनंजय मुंडेवर हल्लाबोल

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेला शरद पवार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ”काहीजण माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर वैयक्तित टीका करत आहेत. त्यांची लायकी नाहीये. त्यांना कशाकशातून बाहेर काढलंय याची यादी काढली तर त्यांना फिरणं मुश्कील होईल, असे जोरदार प्रत्युत्तर शरद पवार यांनी दिले.

धनंजय मुंडे यांच्या आरोपांबाबत पत्रकारांनी शरद पवार यांना विचारले असता ते म्हणाले, ”मी त्यांना उत्तर देणार नाही. ज्यांचं नाव तुम्ही घेता त्यांची लायकी नाही. त्यांना कशाकशातूनं बाहेर काढलं, याची यादी काढली तर त्यांना फिरणं मुश्कील होईल. त्यांनी केलेले उद्योग.. मी सध्या सांगू इच्छित नाही. असे शरद पवार म्हणाले.

”लहान कुटुंबातून आलेला एक तरुण म्हणून मी त्यांना हाताशी धरून आपल्यासोबत घेतले. त्यांना विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी दिली. लोकं माझ्यावर नाराज झालेले तेव्हा तरिही मी त्यांना जबाबदारी दिली. तेच आता माझ्यावर व्यक्तीगत टीका करत आहेत. आज मी त्यांच्याबद्दल अखेरचं बोलतो यापुढे बोलणार नाही, असे शरद पवार म्हणाले.

काय म्हणाले होते धनंजय मुंडे

तुम्ही केले की संस्कार आणि आम्ही केलं की गद्दारी? हे दादांनीच केलेले नाही, अनेकांनी केलं आहे. 2014 मध्ये जे केलं ते संस्कार आणि दादांनी गद्दारी केली. 2017 ला गणेश चतुर्थीच्या दिवशी एक बैठक झाली होती. त्या बैठकीत काय काय ठरले त्याचे व्हिडीओ देखील आहेत माझ्याकडे असा दावा धनंजय मुंडे यांनी केला होता.