
हिंदुस्थानी शेअर बाजारात मंगळवारचा दिवस खऱया अर्थाने अमंगलवार ठरला. बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टीमध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली. मंगळवारी सेन्सेक्स 1 हजारांहून अधिक अंकांनी घसरला. दिवसअखेर सेन्सेक्स 893 अंकांनी घसरून 76,200 अंकांवर बंद झाला, तर निफ्टी 278 अंकांनी घसरून 23,824 अंकांवर बंद झाला. शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदारांना 6 लाख कोटींचा फटका बसला. मार्पेट 475 लाख कोटींच्या खाली आले.
हिंदुस्थानी शेअर बाजारात मंगळवारी गुंतवणूकदारांनी मोठी विक्री केल्याने अवघ्या एका दिवसात सहा लाख कोटींची संपत्ती कमी झाली. या विक्रीमुळे बीएसईवर लिस्टेड कंपनीचे मार्पेट पॅपिटलायझेशन 480.6 लाख कोटींनी घसरून 475 लाख कोटींपर्यंत खाली आले. कमजोर मान्सून आणि बिझनेससंबंधी आकडेवारीच्या चिंतेने बाजारात नफावसुली करण्यात आली. यामुळे शेअर बाजारात घसरण झाली. अमेरिकी फेडरल रिझर्व्हकडून आगामी काळात महागाईला रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याची शक्यता असल्याने जगभरातील शेअर बाजारात घसरण पाहायला मिळाली.




























































