
अतिवृष्टीमुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर. तर भाजपचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी नेवासा तालुक्यातील ऊस उत्पादकांना साखर कारखान्यांकडून हक्काचे पैसे मिळावेत यासाठी तहसीलदार कार्यालयासमोर चटणी-भाकर आंदोलन करत ईडी सरकारला घरचा आहेर दिला.
राज्यासह देशभरात दिवाळीचा उत्साह आहे. मात्र, अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीमुळे ऐन दिवाळीत शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला गेला आहे. नुकसानीचे पंचनामे झाले तरी शेतकऱ्यांना अद्याप सरकारकडून मदत मिळालेली नाही. याच्या निषेधार्थ बुलढाण्यातील शेतकऱ्यांनी दिवाळीच्या पहिल्याच दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनीही या आंदोलनात भाग घेऊन शेतकऱ्यांच्या मागणीचे समर्थन केले. साखर कारखान्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिकाळीच्या पार्श्कभूमीकर रक्कम न दिल्याने नगर जिह्यातील नेकासा तालुक्यातील शेतकऱ्यांनी तहसीलदार कार्यालयासमोर चटणी भाकरी खाऊन सण साजरा करत आंदोलन केले. मुळा आणि भेंडा साखर कारखान्याने ऊस उत्पादकांच्या तोंडाला पाने पुसली. शेतकऱ्यांना हक्काचे पैसे मिळाके अशी मागणी करत आज भाजपचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनीही चटणी भाकरी खात आंदोलन केले.































































