उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुखपदाला हात लावायची हिंमत कोणातही नाही – अनिल परब

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा पक्षप्रमुखपदाचा कार्यकाळ 23 जानेवारीला संपणार आहे. याबाबत उद्या शिवसेनेकडून निवडणूक आयोगाकडे त्यांची भूमिका मांडली जाणार आहे. त्याबाबत शिवसेना नेते व आमदार अनिल परब यांना पत्रकारांनी विचारले असता त्यांनी उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुखपदाला हात लावायची हिंमत कोणातही नाही अशी कडकडीत प्रतिक्रीया दिली आहे. तसेच उद्धव ठाकरे हे आमचे पक्षप्रमुख आहेत व कायम राहतील असेही सांगितले.

”निवडणुक आयोगाचा निकाल काहीही लागला तरी उद्धव ठाकरे हे पक्षप्रमुख आहेत आणि पक्षप्रमुखच राहणार आहेत. या सगळ्या तांत्रिक बाबी आहेत त्या तांत्रिक बाबींना आम्ही जास्त महत्व देत नाही. त्याची जी लढाई आहे ती निवडणुक आयोगासमोर चालू आहे ती चालेल. उद्धव ठाकरे हे आजही आमच्या पक्षाचे प्रमुखे आहेत आणि उद्याही राहतील. कायम आमच्या पक्षाचे प्रमुख राहणार आहेत. निवडणुक आयोगासमोर फक्त औपचारिक मुद्दा आहे. आम्ही शिवसैनिक जोपर्यंत मानतोय तोपर्यंत त्य़ांच्या पक्षप्रमुख पदाला हात लावायची हिंमत कुणातच नाही’, असे त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.