घोषणांचा डोंगर अन् कामाचा भोपळा, खरंच, ‘मराठवाड्याचा विकास, तुम से ना हो पायेगा!’, शिवसेनेचे मराठवाडाव्यापी जनआंदोलन सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त शिवसेनेच्या वतीने ‘मराठवाड्याचा विकास, तुम से ना हो पायेगा!’ हे मराठवाडाव्यापी जनआंदोलन सुरू आहे. याच आंदोलनाचा एक भाग म्हणून कॅम्ब्रिज चौक ते नगर नाका प्रस्तावित उड्डाणपुलाच्या रखडलेल्या कामाकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शिवसेनेच्या वतीने गाजराचा हार घालून प्रतीकात्मक आंदोलन करण्यात आले. यावेळी नारळ फोडून आणि तत्कालीन अनावरण पत्रिकेला गाजराचा हार घालून निषेध व्यक्त करण्यात आला.

या प्रकल्पाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम तत्कालीन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते 25 डिसेंबर 2015 साली माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या वाढदिवसानिमित्त झाले होते. 17,706 कोटींच्या विकासकामांच्या घोषणा केल्या गेल्या, मात्र प्रत्यक्षात उड्डाणपुलाच्या कामाची अवस्था काय तर एक टक्काही काम झाले नाही. महायुती सरकार फक्त कोनशिला बांधून मोठमोठ्या घोषणा करते आणि नंतर जनतेच्या तोंडाला पाने पुसते, अशी भूमिका यावेळी शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी मांडली.