मिंधेंचा दबाव झुगारणाऱया शिवसैनिकांवर दबावतंत्र; एम. के. मढवी यांना पोलिसांकडून अटक

दबाव झुगारणाऱया शिवसैनिकांवर दबाव आणण्यासाठी पोलिसांच्या आडून मिंधेंनी कारवाया सुरू केल्या आहेत. नवी मुंबईतील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ज्येष्ठ नगरसेवक एम.के. मढवी यांना आज ठाणे पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने कथित खंडणीप्रकरणी अटक केली. दरम्यान, मढवी यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती  वाऱयासारखी पसरल्यानंतर शिवसैनिक आणि महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱयांनी मढवी यांच्या ऐरोलीतील कार्यालयासमोर मोठी गर्दी केली. यावेळी त्यांनी खोके सरकारच्या विरोधात  घोषणाबाजी करीत या सूडाच्या राजकारणाचा निषेध केला.

ऐरोलीमध्ये रस्त्यात केबल टाकणाऱया एका ठेकेदाराकडे मढवी यांनी खंडणी मागितल्याचा तथाकथित आरोप पोलिसांनी केला आणि आज त्यांच्यावर थेट अटकेची कारवाई करण्यात आली. मढवी यांना आपल्या गटात ओढण्यासाठी मिंधे गटाने सुरुवातीपासूनच जोरदार फिंिल्डंग लावली होती. मात्र ते कोणत्याच दबावाला झुकले नाहीत. मिंधे गटाकडून होत असलेल्या छळवणुकीचे त्यांनी पत्रकार परिषद घेऊन वस्त्रहरण केले होते. त्यामुळे त्यांच्यावर थेट तडीपारीची कारवाई करण्यात आली होती. या कारवाईवरून न्यायालयाने नवी मुंबई पोलिसांना जोरदार फटकारे लगावले होते. आज मात्र त्यांच्यावर तथाकथित खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. रात्री उशिरा त्यांच्यावर अटकेची कारवाई झाली.