
सामना प्रतिनिधी । मालवण
मालवण नगरपरिषदेच्या विषय समितीच्या सभापती पदाची निवडणूक बिनविरोध झाली. आरोग्य सभापतीपदी शिवसेनेचे पंकज सादये यांची बिनविरोध निवड झाली. तर बांधकाम व महिला व बालकल्याण विषय समितीपदी भाजप नगरसेवक यांची बिनविरोध निवड झाली.
दरम्यान, स्थायी समितीच्या सभापतीपदी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर आणि पाणीपुरवठा व जल:निसारण समितीच्या सभापतीपदी उपनगराध्यक्ष राजन वराडकर हे पदसिद्ध म्हणून कायम राहणार आहेत. प्रांताधिकारी डॉ. विकास सुर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली पालिका सभागृहात झाली. यावेळी प्रभारी मुख्याधिकारी देवानंद ढेकळे उपस्थित होते.
मालवण पालिकेतील भाजप-शिवसेना युतीच्या फॉर्म्युल्यानुसार बांधकाम आणि महिला बालकल्याण विषय समिती भाजपकडे तर आरोग्य सभापती पद शिवसेनेला मिळाले. आरोग्य सभापती पदी शिवसेनेचे पंकज सादये तर बांधकाम सभापती म्हणून भाजपचे नगरसेवक गणेश कुशे, महिला बालकल्याणसाठी पूजा सरकारे व उपसभापती पदी शिवसेनेच्या आकांक्षा शिरपुटे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
































































