संभाजीनगरमध्ये शपथ घेत ‘माझे कुटूंब, माझी जबाबदारी’ मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून कोरोना संसर्ग टाळण्यासाठी राबविण्यात येणारी ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहीम शुक्रवारी जिल्हा प्रमुख आमदार अंबादास दानवे यांच्या उपस्थितीत शपथ घेत सुरू करण्यात आली. या मोहिमेत विविध उपक्रमांच्या माध्यमातून कोरोना संसर्ग टाळण्यासाठी जनजागृती करण्यात येणार आहे.

शिवसेनेच्या वतीने दरवर्षी सदस्य नोंदणी मोहीम राबविण्यात येते. यावर्षी कोरोना संसर्गामुळे जिल्ह्यात शहरासह ग्रामीण भागात सदस्य नोंदणीबरोबरच माझे कुटुंब माझी जबाबदारी या संकल्पनेतून शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी 50 वर्षे आणि त्यावरील वयोगटातील सदस्य असलेल्या कुटुंबांचा बूथनिहाय सर्वे करून कोरोना संसर्ग टाळण्यासाठी उपाययोजनांची माहिती घेतली आहे. वार्डनिहाय, बुथनिहाय जिल्ह्यात कोरोना टाळण्याची शपथ घेत मोहीम हाती घेण्याची शपथ शुक्रवारी घेण्यात आली आहे. शहरातील सिडको -एन 7 भागात जिल्हा प्रमुख अंबादास दानवे यांच्या उपस्थितीत शपथविधी पार पडला. यावेळी उपजिल्हा प्रमुख संतोष जेजुरकर, शहरप्रमुख विश्नाथ स्वामी, दिग्वीजय शेरखाने, संतोष खेंडके, वामन शिंदे, गजानन मनगटे, उपशहर प्रमुख सुरेश कर्डीले, विभागप्रमुख संतोष बोडखे, उपविभागप्रमुख बाबुराव कवाडे, मनोज पावार, लक्ष्मीन पदमणे, राहुल कुमार सोनवणे, सुरेश आहिरे,शाख प्रमुख प्रतिक अंकूश बाबासाहेब सोमवंशी, अप्रतिम भांबळे, उपशाखाप्रमुख शंकर भारती, संतोष शिंगारे, सागर वाजपेयी, जर्नाधन धत्रे, दादासाहेब दरेकर, गणेश गिते, प्रभाकर जाधव, युवासेना रोहीत स्वामी, चैतत्य जोशी आकाश बिडवे, हरिश सोनी आदींची उपस्थिती होती.