इंडोनेशिया मास्टर्स बॅडमिंटन;सायना बनली चॅम्पियन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । जकार्ता

हिंदुस्थानची ‘शटलक्वीन’ सायना नेहवाल हिने तब्बल दोन वर्षांनंतर बीडब्ल्यूएफचे जेतेपद पटकावले. स्पेनच्या कॅरोलिना मरीन हिच्या पायाला दुखापत झाल्यानंतर तिला जेतेपदाच्या लढतीतून माघार घ्यावी लागली. अखेर सायना नेहवालला ‘इंडोनेशिया मास्टर्स’चे जेतेपद बहाल करण्यात आले. पहिल्या गेममध्ये स्पेनची खेळाडू 10-4 अशा फरकाने पुढे होती. मात्र दोन खेळाडूंमध्ये रंगलेल्या रॅलीमध्ये कॅरोलिना मरीन विचित्र पद्धतीने पायावर पडली. त्यानंतर तिने या लढतीमधून माघार घेतली.

यंदाचे वर्ष आम्हा सर्वच खेळाडूंसाठी महत्त्वाचे आहे. अशा वेळी कॅरोलिना मरीनला दुखापत झालीए. ऑलिम्पिकदरम्यान मलाही दुखापतीला सामोरे जावे लागले होते. त्यावेळी माझ्या डोळय़ांमधून अक्षरशः अश्रू वाहू लागले, असे स्पष्ट मत सायना नेहवालने व्यक्त केले.