
बॉक्स ऑफिसवर घसघशीत यश मिळवणारा अभिनेता अक्षय कुमारचा ‘सूर्यवंशी’ हा चित्रपट आता प्रेक्षकांना घरबसल्या पाहता येणार आहे. ओटीटी रिलीजसाठी निर्मात्यांनी नेटफ्लिक्ससोबत तगडा करार केला आहे. रोहित शेट्टीचा ‘सूर्यवंशी’ हा चित्रपट नेटफ्लिक्सने तब्बल शंभर कोटींना विकत घेतल्याची चर्चा आहे. हा चित्रपट 4 डिसेंबरपासून नेटफ्लिक्सवर प्रसारित होणार असल्याची माहिती आहे. लवकरच निर्माते ओटीटी रिलीजची अधिकृत घोषणादेखील करू शकतात. दरम्यान आठ दिवसांत या चित्रपटाने तब्बल 127 कोटी रुपयांची कमाई केली असून या आठवडय़ात ‘सूर्यवंशी’ 150 कोटींचा आकडा सहज पार करेल, असा अंदाज सिने व्यापार विश्लेषकांनी वर्तवला आहे.




























































