शीख सैनिकांसाठी पगडीवर घालता येणाऱ्या हेल्मेटची निर्मिती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशात पहिल्यांदाच शीख सैनिकांसाठी त्यांच्या पगडीवर घालण्यायोग्य असं हेल्मेट बनवण्यात आलं आहे. हे हेल्मेट शीख सैनिकांची बंदुकीच्या गोळ्या आणि त्यांच्या छर्ऱ्यांपासून संरक्षण करेल.

या हेल्मेटला वीर असं नाव देण्यात आलं आहे. या हेल्मेटचं डिझाईन कानपूरच्या एमकेयू या संरक्षण खात्यातील फर्मने केलं आहे. हे हेल्मेट वजनाला हलकं असून ते बुरशीरोधक आणि बुरशीसंसर्ग रोधक देखील आहे. वजनाला हलकं असलं तरी गोळ्यांचे वार सहन करण्याइतपत ते मजबूत आहे.

शीख सैनिक हे हेल्मेट त्यांच्या पगडीवर परिधान करू शकतील. एमकेयू या कंपनीचे अध्यक्ष मनोज गुप्ता यांच्या म्हणण्यानुसार, आम्ही हे हेल्मेट शीख सैनिकांची गरज पाहून डिझाईन केलं आहे. शिखांची पगडी हा त्यांचा अभिमान आहे. पगडी ही फक्त श्रद्धा नसून त्यांच्या साहसाचं, स्वाभिमानाचं आणि समर्पणाचं प्रतीक आहे. आम्हाला त्यांच्या श्रद्धेसोबत कोणतीही तडजोड न करता त्यांना योग्य ते संरक्षण पुरवायचं होतं. त्यामुळे आम्ही हे हेल्मेट बनवलं. या हेल्मेटमध्ये कम्युनिकेशन सिस्टिम, नाईट व्हिजन गॉगल्स, कॅमेरे अशी आधुनिक उपकरणंही बसवता येऊ शकतात, असं गुप्ता यांचं म्हणणं आहे.