
हिंदुस्थानात सट्टेबाजीला परवानगी दिली तर मॅच फिक्सिंगचे प्रमाण वाढेल. सट्टेबाजीतून मोठी माया मिळू शकते, पण क्रिकेटची रया जाऊ शकते, असे स्पष्ट मत ‘बीसीसीआय’च्या भ्रष्टाचारविरोधी संस्थेचे (एसीयू) नवनिर्वाचित अध्यक्ष शब्बीर हुसैन शेखदम खंडवावाला यांनी व्यक्त केले.
क्रिकेटमध्ये सट्टेबाजीला कायदेशीर मान्यता दिल्यास यातून मोठा महसूल मिळू शकतो, असा मानणारा एक मतप्रवाह आहे. मात्र, एसीयूच्या नव्या अध्यक्षांचे याविरुद्ध मत आहे. सट्टेबाजीला मान्यता द्यायची की नाही हा वेगळा मुद्दा आहे. मात्र, मी एक पोलीस अधिकारी या नात्याने सट्टेबाजीमुळे क्रिकेट या खेळाची पार वाट वाटेल असे मला वाटते. त्यामुळे आतापर्यंत सट्टेबाजीला परवानगी मिळाली नाही ते योग्यच झाले, असेही शब्बीर हुसैन शेखदम खंडवावाला म्हणाले.
क्रिकेटमध्ये सट्टेबाजीला थारा असता कामा नये. उलट याबद्दलचे नियम अधिक कडक करायला हवेत. मी नक्कीच या गोष्टीवर काम करणार आहे.




























































