
रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीच्या (एमपीसी) शुक्रवारी होणाऱ्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर तसेच पश्चिम आशियातील वाढत्या तणावामुळे गुंतवणूकदारांनी सावध भूमिका घेतल्याने गुरुवारी देशांतर्गत शेअर बाजारात चढ-उताराचे सत्र पाहायला मिळाले. अखेरीस सेन्सेक्स आणि निफ्टी किरकोळ वाढीसह बंद झाले. बीएसईचा 30 समभागांचा सेन्सेक्स 13.84 अंकांनी वाढून 74,360 अंकांवर स्थिरावला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 10.95 अंकांनी वाढून 23,416 अंकांवर बंद झाला.






























































