धर्मावर आधारीत द्वेषाच्या गुन्ह्यांमध्ये कोणतीही तडजोड होणार नाही – सर्वोच्च न्यायालय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
हे पाच न्यायमूर्ती सध्या काय करतात याबाबत अनेकांना माहिती नाहीये. या पाचपैकी 4 न्यायमूर्ती हे आता निवृत्त झाले असून यातले एक न्यायमूर्ती हे सर्वोच्च न्यायालयात आहेत.

सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी द्वेषपूर्ण भाषण व द्वेषाच्या गुन्ह्यांबद्दल एक महत्त्वपूर्ण टिपण्णी केली आहे. हिंदुस्थानसारख्या धर्मनिरपेक्ष देशात द्वेषपूर्ण भाषण व धर्मावर आधारीत गुन्ह्यांना बिलकूल जागा नाही. त्याबाबतीत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. उत्तर प्रदेशमधील नोयडा येथील एका हेट स्पीचच्या प्रकरणाच्या सुनावणी न्यायमूर्ती केएम जोसेफ यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने ही टिपण्णी केली आहे.

काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती रोहिंटन नरीमन यांनी देशात द्वेष पसरवणारी भाषणे केली जात असल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केलेली. तसेच अशा भाषणांवर सत्ताधारी पक्षाचे वरिष्ठ केवळ जाणीवपूर्वक मौन बाळगूनच असतात असे नव्हे तर त्या भाषणांना पाठिंबाही देतात. विशिष्ट धर्मसमूहाचा नरसंहार करण्याचे वक्तव्य केल्यानंतरही त्यावर कारवाई करण्यास अधिकारी धजावत नाहीत, असे निरीक्षण नरीमन यांनी नोंदवले होते.