
सतत वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असलेली अभिनेत्री स्वरा भास्करने गुपचूप लग्न करुन सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला. स्वराने काहीदिवसांपूर्वी बॉलीवूडच्या महागड्या लग्नांवर टीका करत मला वेळीच सद्बुद्धी आल्याचे सांगितले होते.
महाराष्ट्राच्या समाजवादी पार्टीचा नेता फहद अहमद याच्यासोबत 6 जानेवारी 2023 ला स्वरा भास्करने कोर्ट मॅरिज केले होते. तिने त्याबाबत गुरुवारी 16 फेब्रुवारीला जाहीर केले. स्वराने सोशल मिडीयावर, फहद आणि तिच्या नात्याला सुरुवात झाल्याचे सांगितले. नुकतेच स्वराने द वीक मॅगझीनला दिलेल्या मुलाखतीत बॉलीवूडच्या महागड्या लग्नाबाबत खिल्ली उडवली होती. तिने लिहीले होते की, मागच्या दोन आठवड्यात इंस्टाग्रामवर दोन प्रसिद्ध लग्न पाहिली, ज्यामध्ये क्रिकेटर केएल राहुलने अभिनेत्री अथिया शेट्टीसोबत लग्न केले आणि दुसरे लग्न सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा आडवाणी. स्वराने या लग्नामध्ये झालेला खर्च आणि मिडीयामध्ये येणाऱ्या सततच्या हायलाईट्सची खिल्ली उडवली होती आणि लिहीले होते, मी इंस्टाग्रामचे धन्यवाद मानते की मी ना सिड-कियाराच्या लग्नात वाजलेल्या बॅण्डला ओळखते, मेहेंदी वाल्यालाही ओळखते. म्हणजे मला हेही माहित आहे की तिथले बाथरुम कसे आहे ते. दरम्यान हिंदुस्थानात याला प्रसिद्ध होण्याची एक पद्धत मानली जाते.
स्वराने त्यावेळी तिच्या लग्नाचाही उल्लेख केला. त्यात लिहीले की, मला या गोष्टीचा अंदाज होता की माझे लग्न कसे होणार ते, तेव्हाही जेव्हा माझ्या लग्नाची दूरदूरपर्यंत चर्चा नव्हती. स्वरा एकवेळ होती जेव्हा आपलेही लग्न ग्रॅण्ड करण्याचे ती स्वप्न पाहत होती. मात्र मला काहीकाळाने सद्बुद्धी आली. तिने पुढे लिहीले , मी इंस्टाग्रामवर झालेल्या लग्नाचा खर्चाचा हिशोब करण्याचा निर्णय घेतला. नंतर माझ्या वडिलांना सांगितले की, मी ज्या पद्धतीने लग्न रु इच्छित आहे त्याने मी कर्जात डुबून जाईन. त्यावेळी तिच्या वडिलांनी हसून उत्तर दिले की, आशा आहे की तुझ्यापेक्षा समजूतदार जोडीदाराची निवड केली. कोर्ट मॅरिजनंतर स्वरा भास्कर लवकरत लग्न करणार आहे. मात्र ज्याप्रकारे स्वरा भास्करची रॉयल वेडिंगबाबत विचार आहे त्याने हेच लक्षात येत आहे की ती लग्नही अगदी साधेपणाने करणार आहे.




























































