विकृत! शिक्षिकेने केकमध्ये शुक्राणू घालून विद्यार्थ्यांना दिला खायला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमेरिकेतील लुसियाना येथे एका शिक्षिकेने तिच्या विद्यार्थ्यांना चक्क केकमधून तिच्या पतीचे शुक्राणू खायला घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना 2019 साली उघडकीस आल्यानंतर सिंथिया आणि तिचा नवरा डेनिस याला पोलिसांनी अटक केली. सिंथिया व डेनिस हे अल्पवयीन मुलांवर बलात्कार व लैंगिक शोषण केल्याप्रकरणीही दोषी आढळले असून त्यांना न्यायालयाने 40 वर्षांची शिक्षा सुनावली आहे.

सिंथिया ही शिक्षिका होती तर डेनिस हा पोलीस अधिकारी होता.  काही वर्षांपूर्वीच या दोघांचा घटस्फोट झालेला होता. सिंंथिया ही तिच्याकडे शिकायला येणाऱ्या लहान मुलांचे लैंगिक शोषण करायचे व त्याचे व्हिडीओही तयार करायचे. यात डेनिस तिची मदत करायचा. सिंथिया व डेनिसच्या या विकृतीबाबत एका विद्यार्थ्याने तक्रार केल्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली होती.  सुरुवातीला सिंथियाने तिच्यावर असलेले आरोप फेटाळले मात्र  पोलिसी खाक्या दाखवताच तिने तिच्यावरील गुन्हे मान्य केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. सिंथियाची विकृती इतक्यावरच थांबली नाही. तिने एकदा डेनिसचे शुक्राणू केकमध्ये मिक्स करून तो केक तिच्या विद्यार्थ्यांना खायला दिला होता.

सिंथिया व डेनिस यांच्यावर 150 हून अधिक गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असून. त्याप्रकरणी सिंथियाला 72 वर्षांचा तुरुंगवास होणार होता. मात्र तिने तिचा गुन्हा कबूल केल्याने न्यायालयाने तिची शिक्षा 41 वर्षांपर्यंत कमी केली आहे. या प्रकरणी लवकरच डेनिस विरोधात सिंथियाची साक्ष नोंदविण्यात येणार असून त्यानंतर त्याच्या शिक्षेवर निर्णय घेण्यात येणार आहे.