‘टीम इंडियाने वर्ल्डकप जिंकल्यास सर्व कपडे उतरवेल अन्…’, अभिनेत्रीची घोषणा; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

हिंदुस्थान आणि ऑस्ट्रेलिया संघात वन डे विश्वचषकाचा अंतिम सामना (World cup 2023 final) रविवारी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी मैदानावर रंगणार आहे. तब्बल 20 वर्षांनी हे दोन्ही संघ वर्ल्डकपच्या अंतिम फेरीत आमनेसामने आले आहेत. त्यामुळे 2003मध्ये झालेल्या पराभवाचा बदला घेण्याची संधी रोहितसेनेकडे आहे. हा सामना पाहण्यासाठी पंतप्रधान नरेद्र मोदी यांच्यासह अनेक सेलिब्रिटीही उपस्थित राहणार आहेत.

विश्वविजेतेपदासाठी होणाऱ्या सामन्याबाबत क्रिकेटप्रेमींची उत्कंठा शिगेला पोहोचलेली असतानाच दक्षिणेकडील प्रसिद्ध अभिनेत्रीने एक घोषणा केली आहे. टीम इंडियाने वर्ल्डकप जिंकल्यास आपण सर्व कपडे उतरवून समुद्रकिनारी धावेल अशी घोषणा अभिनेत्री रेखा बोज (Telugu Actress Rekha Boj) हिने केली आहे. मात्र यानंतर तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागतोय.

अभिनेत्री रेखा बोज हिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. यात ती म्हणते, जर टीम इंडियाने 2023 चा वन डे विश्वचषक जिंकला तर मी विशाखापट्टणमच्या समुद्रकिनाऱ्यावर नग्न धावेल. तिची ही पोस्ट सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाली असून नेटकऱ्यांनी यावर प्रतिक्रियाही दिल्या आहेत. अल्पावधीत लोकप्रिय होण्यासाठी आणि प्रसिद्धी मिळवण्यासाटी असे कृत्य करणे लाजिरवाणे असल्याचे नेटकऱ्यांनी म्हटले आहे.

पूनम पांडेची आठवण

दरम्यान, रेखा बोज हिच्या घोषणेनंतर अनेकांनी अभिनेत्री पूनम पांडे हिची आठवण झाली. 2011 साली टीम इंडियाने विश्वचषक जिंकल्यास तर मी नग्न अवस्थेत मैदानात धावेल असे पूनम पांडे म्हटली होती. पुढे हा विश्वचषक टीम इंडियाने जिंकला, पण पूनम पांडेची घोषणा हवेतच विरली. बीसीसीआयने आपल्याला परवानगी नाकारल्याचे तिने त्यानंतर एका मुलाखतीमध्ये सांगितले होते.

कोण आहे रेखा बोज?

रेखा बोज ही तेलुगू चित्रपटसृष्टीतील नावाजलेली अभिनेत्री आहे. तिने ‘मंगलयम’, ‘स्वाति चिनुकु संध्या लेलालो’ आणि ‘कलाय तस्मै नमः’ या चित्रपटांमध्ये काम केलेले आहे. सोशल मीडियावरही ती चांगलीच सक्रिय असते.