अखेर काँग्रेस आणि आपचं जुळलं! दिल्लीसह हरयाणा, गोवा आणि गुजरातच्या जागावाटपाचे गणित सुटले

लोकसभा निवडणूक तोंडावर आली असतानाच काँग्रेस आणि ‘आप’चे जुळले असून पाच राज्यांमध्ये एकत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दोन्ही पक्षांच्या महत्त्वाच्या नेत्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत आज दिल्लीसह हरयाणा, गोवा, चंदिगड आणि गुजरातमधील लोकसभेच्या जागावाटपाचे गणित अखेर सुटले. कोण कोणत्या जागा लढवणार यावर शिक्कामोर्तब झाल्याने भाजपची मात्र डोकेदुखी चांगलीच वाढली आहे.

आम आदमी पार्टी दिल्लीत चार जागा तर काँग्रेस पक्ष तीन जागांवर निवडणूक लढवणार आहे. या पत्रकार परिषदेला काँग्रेसकडून मुकुल कासनिक, दीपक बाबरिया, अरविंदर सिंह लवली तर ‘आप’कडून सौरभ भारद्वाज, आतिशी, संदीप पाठक यांची उपस्थिती होती. यावेळी दिल्लीसह चार राज्यांत काँग्रेस आणि आप एकत्र लढणार असल्याची घोषणा करण्यात आली. आगामी निकडणुकीत ‘इंडिया’ आघाडीतील घटकपक्ष या नात्याने आम्ही दोन्ही पक्ष मजबुतीने लढू. हायकमांडने दिलेले सर्व निर्देश इमानेइतबारे पाळू, असे अरविंदर सिंह लवली म्हणाले.

केजरीवालांना अटक केल्यास देशात त्सुनामी
काँग्रेससोबत आघाडी करू नये यासाठी भाजपकडून धमक्या मिळत आहेत. मुख्यमंत्री अरविंद केजरीकाल यांना अटक करण्याची धमकी दिली जात आहे, परंतु केजरीवाल यांना अटक झाली तरीही काँग्रेससोबत असलेली एकजूट कायम राहील. ज्या दिवशी केजरीवाल यांना अटक केली जाईल त्या दिवशी संपूर्ण देशात ‘आप’च्या समर्थनार्थ देशात त्सुनामी येईल. भाजपचे संपूर्ण राजकीय गणित बिघडेल, असा इशारा ‘आप’ने भाजपला दिला.

दिल्ली, चंदिगडकरून सुरू होत्या वाटाघाटी
दिल्ली व चंदिगडच्या जागेवरून दोन्ही पक्षांमध्ये पेच निर्माण झाला होता. मात्र, प्रदीर्घ चर्चेनंतर दिल्लीतील सात जागांपैकी आम आदमी पक्ष नवी दिल्ली, पश्चिम दिल्ली, दक्षिण दिल्ली आणि पूर्व दिल्लीची जागा लढणार आहे. तर, काँग्रेस चांदनी चौक, उत्तर-पूर्व आणि उत्तर पश्चिम मतदारसंघात निवडणूक लढवेल.

बंगालमध्येही जमणार?
प. बंगालमध्ये तृणमूलने काँग्रेसला 5 जागा देण्याची तयारी दर्शवली आहे. दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये चर्चा सुरू असून जागावाटपाचा तिढा सुटण्याची आशा आहे.

असे ठरले जागावाटप
काँग्रेस आप
दिल्ली एकूण जागा :7
काँग्रे
03 04
गुजरात एकूण जागा : 26
24 02
(भरूच आणि भाकनगर)

हरयाणा एकूण जागा : 10
09 01
चंदिगड एकूण जागा : 1
01 00
गोका एकूण जागा : 2
02 00