हे करून पहा – पंख्याची हवा नीट येत नाही…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 पंख्याची हवा व्यवस्थित न येण्याची अनेक कारणे असू शकतात. पंख्याच्या पात्यांवर धूळ साचल्यामुळे हवेचा वेग मंदावतो. पंखा बंद करून ओल्या कापडाने किंवा ब्रशने त्याची पाती व्यवस्थित पुसून घ्या. पाती तपासून घ्या.
 पंख्याच्या पात्यांचा अँगल बदलला असेल किंवा ती वाकडी झाली असतील तर पुरेशी हवा मिळत नाही. अनेकदा पंख्याचा वेग कमी होण्याचे मुख्य कारण कमकुवत झालेला कंडेन्सर हे असते. तो बदलून पाहिल्यास पंख्याचा वेग वाढू शकतो.