राज्य मंत्र्यांची एवढी कृपा !

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनीधी । डोंबिवली

सात माळ्यांची अनधिपृत इमारत वाचवण्यासाठी 35 लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने रंगेहाथ पकडलेले कल्याण-डोंबिवली महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांना  प्रशासन पाठीशी घालत असल्याचे उघडकीस आले आहे. घरत यांना लाच घेताना रंगेहाथ पकडल्यानंतर त्यांना बुधवारी दुपारी अटक करण्यात आली. गेली चार दिवस ते पोलीस कोठडीत आहेत, मात्र तरीही त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आलेली नाही.

२७ गावांतील एक सात मजली इमारत वाचवण्यासाठी संजय घरत यांनी इमारतीच्या मालकाकडे ४२ लाख रुपयांची लाच मागितली होती. हा सौदा नंतर ३५ लाख रुपयांवर ठरला. पहिला हप्ता ८ लाख रुपयांचा घेताना घरत यांना बुधवारी दुपारी लाचलुचपतच्या अधिकाऱयांनी अटक केली. त्यांना पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. दोन दिवसांपेक्षा जास्त पोलीस कोठडीत राहिल्यानंतर त्यांना प्रशासनाने निलंबित करणे आवश्यक होते. मात्र घरत गेली चार दिवस पोलीस कोठडीत आहेत, तरीही त्यांना अद्याप निलंबित करण्यात आलेले नाही. प्रशासन घरत यांच्यासारख्या लाचखोर अधिकाऱयाला वाचवण्यासाठी जिवाचा अटापिटा करीत असल्याचे उघडकीस आल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

एसीबीचा अहवाल आलेला नाही

लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने अधिकारी पिंवा कर्मचाऱ्यांना पकडल्यानंतर त्यांना निलंबित करण्यासाठी त्याच विभागाचा अहवाल महत्त्वाचा असतो. संजय घरत यांचा अहवाल अद्यापपर्यंत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पाठवलेला नाही. तो अहवाल प्राप्त झाल्यानंतर घरत यांच्यावर निलंबनाची कारवाई होणार आहे. घरत हे ४८ तासांपेक्षा जास्त पोलीस कोठडीत आहेत. त्यामुळे त्यांचे निलंबन हे नक्की आहे, अशी प्रतिक्रिया आयुक्त गोविंद बोडके यांनी दिली.