जम्मू कश्मीरमध्ये चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जम्मू कश्मीरमधील श्रीनगर शहरातल्या रामबाग भागात जवान व दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत जवानांनी तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांची ओळख पटविण्याचे काम सध्या सुरू आहे.

शनिवारी कुलगाम जिल्ह्यात झालेल्या चमकीत एक दहशतवादी ठार झाला होता. हा दहशतवादी हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर मुदसिर अहमद वागे होता. तो 2018 पासून कश्मीर खोऱ्यात दहशतवादी कारवा.ा करत होता.