
रिकाम्या पोटी हे खाऊ नका!
चहा
खरं तर चहा जास्त पिणं आरोग्यासाठी अपायकारकच असते. पण रिकाम्या पोटी चहा कधीच प्यायचा नाही. कारण चहामध्ये ऍसिड भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे रिकाम्या पोटी चहा प्यायल्यास पोटात जळजळ होऊ शकते.
संत्रे
संत्र्यामध्ये ऑर्गेनिक ऍसिड असते. त्यामुळे शरीरात ऍसिडचे प्रमाण वाढते. रिकाम्या पोटी संत्री खाल्ली तर पोटातील या ऍसिडचे प्रमाण आणखी वाढते. ते आरोग्यासाठी घातक ठरते.
रताळे
रिकाम्या पोटी रताळे खाणे शक्यतो टाळावे. कारण रताळ्यामध्ये टॅनिन आणि पॅक्टीन मोठय़ा प्रमाणावर असतात. रिकाम्या पोटी शरीरात ते गेल्यामुळे ते पचत नाही. यामुळे छातीत जळजळ होऊ शकते.
कोल्ड ड्रिंक
कोल्ड ड्रिंकही कधीतरी प्यायलं तर ठीक. त्यातूनही अनशेपोटी कोल्ड ड्रिंक कधीच पिऊ नये. कारण त्यात कार्बोनेट ऍसिड मोठय़ा प्रमाणात असते. रिकाम्या पोटी कोल्ड ड्रिंक प्यायले तर पोटात ढवळून उलटय़ा होण्याची शक्यता बळावते.
दही
रिकाम्या पोटी दही तर मुळीच खाऊ नये. कारण दह्यातील प्रोबायोटिक बॅक्टेरिया रिकाम्या पोटात ऍसिडची मात्रा वाढवतात आणि त्यामुळे पोटात हमखास जळजळ होते.
केळे
भूक लागली की केळी खाल्ली जातात. पण रिकाम्या पोटी पोटात केळे गेले तर ऍसिडीटी वाढते. केळ्यात कॅल्शियम आणि मॅग्नेशियम खूप असते. त्यामुळे पोटात कॅल्शियम आणि मॅग्नेशियम यांचा समतोल बिघडतो. हा समतोल बिघडल्याने पोटात ऍसिडीटी होते.




























































