
सामना प्रतिनिधी। तुमसर
दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा पत्रकार असोसिएशन तुमसर तर्फे मराठी पत्रकार दिन निमित्ताने ‘भारतातील प्रसारमाध्यमांची नेमकी भूमिका काय’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून मा. कमलेशजी सुतार, आज तक आणि इंडिया टुडेचे उप संपादक तथा सुचिताजी राहाटे, वरिष्ठ पत्रकार साम टीव्ही मराठी वृत्तवाहिनीचे पत्रकार कार्यक्रमाला उपस्थित होते. सदर कार्यक्रम मातोश्री लॉन, नवीन बस स्थानकाच्या बाजूला, श्रीराम नगर, तुमसर येथे आयोजित करण्यात आले होते.
आपल्या विचारातून आदर्श व निर्भीड विचारांना वारसा देणाऱ्या सर्व पत्रकार बांधवांना शिवसेना प्रणित युवासेना तर्फे पत्रकार दिनाच्या निमित्ताने त्यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांच्या सत्कार करण्यात आले.
यावेळी युवासेना तालुका अधिकारी संजू डहाके, शिवसैनिक अमित एच. मेश्राम, युवासेना शहर अधिकारी प्रवीण गुप्ता, रवींद्र ठवकर, स्वप्नील भिवंगडे, अमण सिद्दीकी सह सह शिवसैनिक उपस्थित होते. या कार्यक्रमाला तुमसर तालुक्यातील सर्व पत्रकार बंधू, विविध पक्षाचे राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते तथा सन्माननीय नागरिक उपस्थित होते.

































































