सुआरेजचा शंभराव्या सामन्यात गोल, उरुग्वेचा सलग दुसरा विजय

सामना ऑनलाईन । मॉस्को

बुधवारी रात्री उरुग्वे आणि सौदी अरेबिया संघात सामना रंगला. या सामन्यात उरुग्वेने सौदी अरेबियाचा १-० असा पराभव करत अंतिम १६ मध्ये दाखल होण्याकडे वाटचाल सुरू ठेवली आहे. उरुग्वेचा हा सलग दुसरा विजय तर सौदी अरेबियाचा सलग दुसरा पराभव आहे. उरुग्वेकडून दिग्गज खेळाडू सुआरेजने सामन्याच्या पहिल्या हाफमध्ये २३ व्या मिनिटाला गोल केला.

सामन्याचे वैशिष्ट्य म्हणजे उरुग्वेचा स्टार स्ट्रायकर लुईस सुआरेज याचा आज १०० वा आंतरराष्ट्रीय फुटबॉल सामना होता. या सामन्यात विजयी गोल करत सुआरेजने हा सामना अविस्मरणीय केला. सुआरेजचा हा तिसरा विश्वचषक असून आतापर्यंत त्याने ६ गोल झळकावले आहेत.

पोर्तुगालने ३२ वर्षापूर्वीच्या पराभवाचा वचपा काढला