
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या देवळालीच्या आमदार सरोज बाबुलाल अहिरे या आज त्यांच्या अडीच महिन्यांच्या बाळाला घेऊन विधीमंडळ अधिवेशनात सहभागी झाल्या होत्या. त्यामुळे आज विधीमंडळात त्यांचे कौतुक होत होते.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या देवळालीच्या आमदार @SarojAhire113
या आज आपल्या अडीच महिन्यांचे बाळ प्रशंसकला घेऊन विधिमंडळ अधिवेशनात सहभागी झाल्या. आपल्या मतदारसंघातील प्रश्न अधिवेशनात मांडणे हे माझे कर्तव्य आहे. #हिवाळीअधिवेशन२०२२ pic.twitter.com/rOY2twU60y— NCP (@NCPspeaks) December 19, 2022
सरोज अहिरे यांनी 30 सप्टेंबरला बाळाला जन्म दिला. प्रशंसक असे त्यांच्या बाळाचे नाव आहे. प्रशंसकच्या जन्मानंतरचे हे पहिलेच अधिवेशन आहे. त्या अधिवेशनाला प्रशंसकला घेऊन हजर राहिल्या आहेत.
View this post on Instagram
”कोरोना परिस्थितीमुळे दोन वर्षांनंतर नागपूरमध्ये अधिवेशन होत आहे. माझे बाळ अडीच वर्षाचे आहे. मात्र आपल्या मतदारसंघातील प्रश्न अधिवेशनात मांडणे हे माझे कर्तव्य आहे. त्यामुळे मी आज बाळाला घेऊन अधिवेशनाला उपस्थित राहिले आहे. माझे कुटुंबीय माझ्यासोबत आले असून ते बाळाला सांभाळतील व मी अधिवेशनात माझ्या मतदारसंघाचे प्रश्न मांडेन”

































































