विद्या प्रसारक मंडळाचे प्रभाकर ठाकूर यांचे निधन

विद्या प्रसारक मंडळाचे संस्थापकीय सदस्य आणि विद्यमान खजिनदार प्रभाकर (भाऊ) ठाकूर यांचे अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले. प्रभाकर ठाकूर हे शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी आयुष्यभर झटत राहिले. कोव्हिडच्या काळात गरीब विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नयेत म्हणून अशा विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने शिक्षण घेता यावे म्हणून स्वतः पुढाकार घेत निधी जमवून शाळेच्या वतीने मोफत मोबाईल उपलब्ध करून दिले. विज्ञानसारख्या विषयाचे सुलभ पद्धतीने विद्यार्थ्यांना आकलन व्हावे म्हणून स्मार्ट बोर्डद्वारे शिकविण्याची सोय केली.