कोहलीने पुन्हा RCB ची कप्तानी स्विकारल्यास अनेक बाबी सोप्या होतील; माजी क्रिकेटपटूचे मत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आयपीएलमध्ये विराट कोहली पुन्हा कर्णधार म्हणून दिसला का, असा सवाल उपस्थित होत आहे. विराट कोहलीच्या कर्णधार पदाबाबत माजी क्रिकेटपटू अजित आगरकरने महत्त्वाचे विधान केले आहे. विराट कोहलीने जर आरसीबीचे कर्णधारपद पुन्हा स्वीकारले तर संघासाठी अनेक बाबी सोप्या होतील, असे मत आगरकरने व्यक्त केले आहे. कोहलीने आरसीबीचे क्रणधारपद सोडल्यानंतर आगरकरने हे विधान केले आहे.

विराट कोहलीने पुन्हा आरसीबीचे क्रणधारपद स्विकारल्यास, संघाची कप्तानी करण्यास विराट तयार झाल्यास संघाला ते फायद्याचे ठरेल, असे आगारकरने म्हटले आहे. आरसीबीने काही वर्षे चांगले प्रदर्शन केलेले नाही. तसेच दीर्घकाळ टिकून राहील, असा संघ दिसत नाही. त्यामुळे या काळात विराटने संघाचे कर्णधारपद स्विकारल्यास संघासाठी ते चांगले ठरेल, असे आगारकर यांनी सांगितले.

आरसीबीने नेहमी सुरुवातीच्या तीन टॉप फलंदाजांवर लक्ष केंद्रीत केले आहे. संघाकडे असलेल्या पैशांवर अनेक गोष्टी अवलंबून असतात. किती चांगले खेळाडू संघात असतील, त्यावर सर्व गोष्टी ठरतात. एकाच चांगल्या खेळाडूनवर संघाने पैसे खर्च केले, तर तो फक्त चांगली खेळी करू शकतो, जिंकणे किंवा पराभव हे तर संघातील खेळाडूंवर अवलंबून असते, असे आगरकर म्हणाले.

टी-20 विश्वचषकापूर्वी कोहलीने आयपीएलमधील आरसीबी संघाचे कर्णधारपद सोडले होते. 2021 मध्ये आयपीएलच्या दुसऱ्या सत्रात कोहलनी संघाचा कर्णधार होता. त्यानंतर त्याने क्रणधारपद सोडले आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने विराट कोहली, मोहम्मद सिराज आणि ग्लेन मॅक्सवेल यांना रिटेन केले आहे. त्यामुळे संघासाठी विराटने पुन्हा कर्णधारपद स्विकारावे, असे मत आगरकरने व्यक्त केले आहे.