पश्चिम बंगालमध्ये मतदानावेळी हिंसा, CISF च्या गोळीबारात चार जणांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
फाइल फोटो

पश्चिम बंगालमध्ये चौथ्या टप्प्यासाठी मतदान सुरू आहे. मतदानादरम्यान अनेक ठिकाणी हिंसक घटना घडल्या अहेत. कुचबिहार जिल्ह्यात भाजप आणि तृणमूलच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली असून पोलिसांना लाठीचार्ज करावा लागा. तसेच बूथ क्रमांक 285 वर बॉम्ब फेकण्यात आले होते. पोलिंग बूथबाहेर मतदानासाठी आलेल्या एका तरुणाचा गोळीबारात मृत्यू झाला आहे.

बंगाल पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बूथवर काही समाजकंटकांनी हिंसा सुरू झाली एव्हा CISF च्या जवानांना गोळीबार करावा लागला. या गोळीबारात चार जणांचा मृत्यू झाला.

बूथवर काही समाजकंटकांनी सरकारी वाहनाला लक्ष्य केले तेव्हा जवानांना गोळीबार करावा लागा.आ तेव्हा बूथ क्रमांक 5/126 वर चार जणांचा मृत्यू झाला. निवडणूक आयोगाने याबाबत सविस्तर अहवाल मागितला आहे. तसेच जेव्हा जवानांवर ग्रामस्थांनी हल्ला केला तेव्हा गोळीबार केल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले.