
आज खंडग्रास सूर्यग्रहणाच्या आधीच व्हॉट्सअॅपला तांत्रिक ग्रहण लागलं होतं, त्यामुळे अनेकांचा गोंधळ उडाला आणि फोनाफोनी सुरू झाली होती. दोन तासांनंतर हे तांत्रिक ग्रहण सुटलं आणि सेवा पूर्ववत झाली.
जगभरातील अब्जावधींच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनलेल्या WhatsApp ची सेवा गेल्या दोन तासांपासून ठप्प झाली होती. मेसेज ना येत होते ना जात होते, अशी तक्रार अनेकांकडून सुरू होती. मेसेज जात येत नसल्याने फोनाफोनी सुरू झाली होती. अखेर दोन तासांच्या ब्रेकनंतर व्हॉट्सअॅप पुन्हा एकदा सुरू झालं आहे. त्यामुळे युझर्सचा जीव भांड्यात पडला आहे.
#UPDATE: #WhatsApp services have resumed after over an hour of outage pic.twitter.com/ggIkHO1mKo
— ANI (@ANI) October 25, 2022




























































