नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यात संसदेत आमच्यासमोर उभे राहण्याचे धाडस नाही – राहुल गांधी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमित शहा यांच्या यांच्यात संसदेत आमच्यासमोर उभे राहण्याचे धाडस नाही, हे त्यांनी मागील १५ दिवसांत आम्हाला दाखवलं आहे. नरेंद्र मोदी आणि अमित शहा या दोघांमध्येही धाडस नाही, असा हल्लाबोल लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर केला आहे. नीट पेपरफुटीच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष पोलीस लाठीमार आणि पेलेट गन गोळीबार प्रकरणी त्यांनी अमित शहा यांना सवाल केला आहे की, “जंतरमंतर येथे विद्यार्थ्यांवर लाठीमार आणि पेलेट गनने गोळीबार करण्याचे आदेश कोणी दिले?”

दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना राहुल गांधी म्हणाले की, “प्रश्न हा नव्हता की अमित शहा संसदेत येऊन काही सामान्य विषयांवर भाषण देतील. प्रश्न नेहमीच हा राहिला आहे की, अमित शहा यांना हे स्पष्ट करावे लागेल की, दिल्लीत तरुणांवर गनने गोळीबार करण्याचा आदेश कोणी दिला होता. पेलेट गन चालवल्या गेल्या, विद्यार्थ्यांना खिळे ठोकलेल्या काठ्यांनी मारहाण करण्यात आली. त्यांनी हे स्पष्टपणे सांगितले पाहिजे. त्यांनी याचा आदेश दिला होता की नाही? जर त्यांनी आदेश दिला असेल, तर आपल्या विद्यार्थ्यांवर गोळीबार करण्यासाठी ते दोषी आहेत. आणि जर त्यांना या घटनेबद्दल काहीच माहिती नसेल, तर ते अयोग्य आहेत. दोन्ही परिस्थितींमध्ये, त्यांनी पद सोडले पाहिजे. हाच चर्चेचा विषय होता.

ते पुढे म्हणाले की, “दुसरी गोष्ट, जे काही घडले आहे त्यासाठी पंतप्रधानांनी माफी मागावी. आणि तिसरी गोष्ट राम मंदिरातील चोरीचा मुद्दा होता. पंतप्रधानांच्या अत्यंत जवळच्या लोकांनी राम मंदिरात चोरी केली आहे. हे तीन मुद्दे आहेत. तर आता अमित शहा अचानक म्हणत आहेत की, ते बोलण्यासाठी तयार आहेत. आम्हाला त्यांच्या मन की बात ऐकण्यात कोणताही रस नाही. आम्हाला या गोष्टीत रस आहे की, त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांवर गोळ्या झाडण्याचा आदेश दिला होता की नाही. सर्वात आधी, त्यांनी ही गोष्ट पूर्णपणे स्पष्ट केली पाहिजे. त्यानंतरच कोणत्याही चर्चेचा प्रश्न उद्भवतो. हीच परिस्थिती आहे. आणि विरोधी पक्ष हीच मागणी करत आहे. आम्ही गेल्या १५ दिवसांपासून हीच मागणी करत आहोत.”