
एका महिलेच्या बुटात घुसलेला किडा तिच्या पायाला चावल्याने तिच्या पायाची अवस्था भयंकर झाली आहे. हा किडा चावल्यानंतर काही तासांनी तिने पाय पाहिला तेव्हा त्याचा अंगठा काळा ठिक्कर पडलेला होता तर अंगठ्याचे नख हे पिवळे पडलेले होते. सदर महिलेवर सध्या उपचार सुरू असून तिच्या पायाचे नख सडून गळून पडू शकते असा अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला आहे.

थासयनारा वरगास असे त्या महिलेचे नाव असून ब्राझिलमधील रिओ दी जेनेरिओ येथे राहते. थासयनारा हिचा व्यवसाय असून तिच्या दुकानात जाण्यासाठी निघताना तिने तिचे नियमित वापरातले शूज घातले. काही वेळातच तिला काहीतरी चावल्यासारखे जाणवले. तिने शूज काढून पाहिले असता तिला त्यात एक किडा दिसला. त्या किड्याला तिने मारले व त्यानंतर पुन्हा शूज घातला. संध्याकाळी जेव्हा ती घरी परत आली तेव्हा तिचा पाय बधून तिला धक्काच बसला. तिने तत्काळ तिच्या बॉयफ्रेंडला घेऊन रुग्णालय गाठले. त्यावेळी डॉक्टरानी तिला किड्याच्या शरीरातील विषारी द्रव्यामुळे असे घडल्याचे सांगितले.




























































