
सामना प्रतिनिधी । बंगळुरू
हॉकी इंडियाकडून ज्युनियर राष्ट्रीय शिबीरासाठी 33 महिला हॉकीपटूंची निवड करण्यात आली. या शिबीराला आठ जुलैपासून बंगळुरूत सुरूवात होणार आहे. प्रशिक्षक बलजीत सिंग सैनी यांच्या मार्गदर्शनाखाली युवा हॉकीपटू खेळाचे कसब आत्मसात करताना दिसतील.
निवड झालेले खेळाडू खालीलप्रमाणे
गोलकीपर : रशनप्रीत कौर, खुशबू, एफ रामेंगमावी
बचावफळी : प्रियांक, सिमरन सिंग, मरीना, गगनदीप कौर, इशिका चौधरी, जोतिका कालसी, सुमीता, अक्षता ढेकले, उषा, परणीत कौर
मिडफिल्डर : बलजीत कौर, मरीयाना कुजूर, किरण, प्रभलीन कौर, प्रीती, अजमीना कुजूर, वैष्णवी फाळके, कविता बागडी, बलजिंदर कौर, सुष्माकुमारी
आक्रमक फळी : मुमताज खान, ब्युटी डुंगडुंग, गुरमेल कौर, दीपिका, लालरिनदीकी, जिवान तोप्पो, रूतूजा पिसाळ, संगीताकुमारी, योगिता बोरा, अन्नू.




























































