विश्वविजेत्या निखतला राष्ट्रकुल स्पर्धेत जिंकायचीत 4 सुवर्णपदके

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानची विश्वविजेता महिला बॉक्सर निखत झरीनला यंदाच्या बर्मिंगहॅम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत देशासाठी चार सुवर्णपदके जिंकायची आहेत. तसा निर्धार तिने बोलून दाखवला आहे. येत्या 28 जुलैपासून इंग्लंच्या बर्मिंगहॅम शहरात यंदाची राष्ट्रकुल स्पर्धा खेळवली जाणार आहे. 2018 मध्ये ऑस्ट्रेलियात खेळवल्या गेलेल्या गोल्डकोस्ट राष्ट्रकुल स्पर्धेत हिंदुस्थानी मुष्टियुद्ध पथकाने चमकदार कामगिरी नोंदवत तीन सुवर्ण, तीन रौप्य आणि तीन कास्यपदके अशी नऊ पदके पटकावली होती. सहा वेळची विश्वविजेती मेरी कोम त्या स्पर्धेत हिंदुस्थानसाठी चॅम्पियन बॉक्सर ठरली होती. आता मेरी कोमच्या अनुपस्थितीत निखतवर हिंदुस्थानला चमकदार यश मिळवून देण्याची जबाबदारी आहे.