
भाजप खासदार, भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्याविरुद्ध जंतर-मंतरवर आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंची काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांनी भेट घेतली. प्रियंका गांधी यांनी महिला खेळाडू विनेश फोगाट, साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया यांच्याशी संवाद साधत त्यांची समस्या जाणून घेतली. यावेळी महिला कुस्तीपटूंना आपल्या भावना अनावर झाल्याने प्रियंका यांनी मायेने त्यांच्या डोक्यावरून हात फिरवत त्यांना धीर दिला.
कुस्तीपटूंची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना प्रियंका गांधी यांना मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला. बृजभूषण शरण सिंह यांच्यावर दोन गुन्हे दाखल झाले आहेत. यापैकी एक पोक्सो कायद्यांतर्गत असून त्याची कॉपी अद्याप मिळालेली नाही. त्यामुळे त्यांच्याविरोधात कोणकोणती कलमं लावण्यात आली आहेत हे कळण्याचा मार्ग नाही. गुन्हा दाखल झाला असेल तर कॉपी देण्यास टाळाटाळ का? असा सवाल सवाल करत प्रियंका गांधी यांनी ज्या व्यक्तीवर गंभीर आरोप झालेत त्याची पदावर असताना चौकशी शक्य नाही असे म्हटले. त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही प्रियंका यांनी केली.
बृजभूषण यांच्यावर दाखल करण्यात आलेली एफआयआरची कॉपी का दाखव नाहीत? जेव्हा हे कुस्तीपटू पदक जिंकतात तेव्हा आपण अभिमानाने ट्विट करतो, पण आज ते रस्त्यावर बसले आहेत आणि त्यांना न्याय मिळत नाहीत. या सर्व महिला खेळाडूंना इथपर्यंत येताना खूप संघर्ष करावा लागलाय आणि सरकार त्यांना (बृजभूषण शरण सिंह) का वाचवत आहे हेच मला समजत नाहीय? असे प्रियंका गांधी म्हणाल्या.
पंतप्रधानांकडून आपल्याला कोणताही अपेक्षा नाही. कारण त्यांना कुस्तीपटूंची काळजी असती तर त्यांनी त्यांच्याशी संवाद साधला असता, भेट घेतली असती, असेही त्या म्हणाल्या. तसेच संपूर्ण देश कुस्तीपटूंच्या पाठिशी असून त्यांनी या मुद्द्यावर आवाज उठवल्याने आपल्याला त्यांचा अभिमान असल्याचेही प्रियंका म्हणाल्या.
I don’t have any expectations from the PM, because if he is worried about these wrestlers, then why has he not talked to them or met them yet. The nation is standing with them and I am very proud that these wrestlers have raised their voices against such an issue: Congress leader… pic.twitter.com/bT3pfvnV8r
— ANI (@ANI) April 29, 2023
कुस्तीपटू आंदोलनावर ठाम
दरम्यान, बृजभूषण यांच्याविरुद्ध दोन गुन्हे दाखल करण्यात आले असले तरी कुस्तीपटू आंदोलनावर ठाम आहेत. जोपर्यंत त्यांना अटक होत नाही तोपर्यंत आपण जागेवरून हलणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता सरकार आपल्याच खासदाराविरुद्ध काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष आहे.
महिला कुस्तीपटूंच्या संघर्षाला यश, भाजप खासदार बृजभूषण यांच्यावर लैंगिक छळाचा गुन्हा




























































