
फिटनेस फ्रायडे क्लबतर्फे आंतरराष्ट्रीय योग दिन मोठय़ा उत्साहात साजरा करण्यात आला. अंधेरीच्या शहीद हेमंत करकरे उद्यान येथे आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पहाटेपासूनच 300 हून अधिक योगप्रेमींनी उपस्थित राहून कार्यक्रमाला उत्साहपूर्ण प्रतिसाद दिला. कार्यक्रमाची सुरुवात फिटनेस प्रशिक्षक संतोष पेडणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वॉर्म-अप सत्राने झाली. त्यानंतर डॉ. अवनी कनाकिया यांनी योगसत्राचे नेतृत्व केले. त्यांना योग प्रशिक्षक अनिता आणि राजेश यांचे सहकार्य लाभले. सूर्यनमस्कार चॅलेंजमधील सहभागींचा पदके प्रदान करून गौरव करण्यात आला. दरम्यान डॉ. अवनी कनाकिया लिखित ‘डिजिटल पाथ टू इनर पिसः इंटिग्रेटिंग योगा अॅण्ड टेक्नॉलॉजी इन मॉडर्न एज्युकेशन’ या पुस्तकाचे प्रकाशन डॅनियल वाझ यांच्या हस्ते करण्यात आले.





























































