मुलाच्या आत्महत्येनंतर आईनेही घेतला गळफास, लातुरातील हृदयद्रावक घटना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । लातूर

लातूरमध्ये हृदयद्रावक घटना घडली असून मुलाच्या आत्महत्येनंतर आईनेही गळफास घेऊन जीवन संपवले. निलंगा लातुक्यातील मौजे निटूर येथे ही घटना घडली आहे.

मौजे निटूर येथील नितीन सुभाष घोडके (30) याने दुपारी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची माहिती सायंकाळच्या सुमारास त्याच्या आई आशाबाई सुभाष घोडके (50) यांना शेतात काम करत असताना समजली. मुलाच्या आत्महत्येने धक्का बसलेल्या आशाबाई यांनी शेतातच गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकाराने निलंगा तालुक्यात खळबळ उडाली आहे. आत्महत्येचे कारण स्पष्ट झाले नाही.