शेततळ्यात पोहण्यासाठी उतरला अन् जीव गमावला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । शिरूर अनंतपाळ

साकोळ येथे एका १६ वर्षीय तरुणाचा शेततळ्यामध्ये पोहत असताना बुडून मृत्यू झाला. विशाल बालाजी हिंगपिरे असे या मृत तरुणाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी शेताकडे जात असताना शेताच्या वाटेतच असलेल्या बालाजी पाटील यांच्या शेततळ्यामध्ये पोहण्यासाठी उतरला. परंतु व्यवस्थित पोहता येत नसल्यामुळे व शेततळ्यांमध्ये मेणकापड टाकलेले असल्यामुळे उतार निसरडा झाला होता. शेततळ्याच्या वर येण्यासाठीही कोणतेही साधन नसल्यामुळे त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

विशाल साकोळ येथील जिल्हा परिषद प्रशालेतून यावर्षीच दहावी पास झाला होता. त्याला ६५ टक्के गुण मिळाले होते. विशालचे वडील बालाजी हिंगमिरे अल्पभूधारक शेतकरी असून शेतीवरच त्यांची गुजराण चालते. त्यांना विशाल व संभाजी (१३) अशी दोन मुले व रेश्मा (११) मुलगी आहे. विशालचे शवविच्छेदन साकोळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात करण्यात आले.