प्रेयसीला भेटायला घरी गेला, अचानक आई आली; लपण्याच्या प्रयत्नात प्रियकराचा 10व्या मजल्यावरून पडून मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भुवनेश्वरमध्ये धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेयसीला भेटायला घरी गेलेल्या 17 वर्षाच्या प्रियकराचा दहाव्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला. रफान खुर्शीद असे मयत प्रियकराचे नाव आहे. प्रेयसीची आई अचानक घरी आल्याने घाबरून लपण्याचा प्रयत्न प्रियकराच्या जीवावर बेतला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला.

इंडिया टीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, रफान इयत्ता अकरावीत शिकत होता. घटनेदिवशी प्रेयसी घरी एकटी असल्याने तो तिला प्रेयसीला भेटायला तिच्या दहाव्या मजल्यावरील फ्लॅटवर गेला होता. त्याचवेळी तिची आई अचानक घरी आली. यामुळे घाबरलेला रफान इमारतीच्या डक्ट यार्डमधील एका पाईपला लटकला. यावेळी त्याचा तोल गेला आणि तो खाली पडला. दहाव्या मजल्यावरून पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे अपार्टमेंट कॉम्प्लेक्समध्ये घबराट पसरली.

घटनेची माहिती मिळताच, पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेह ताब्यात घेतला. मृतदेह शवविच्छेदनासाठी भुवनेश्वर येथील कॅपिटल हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला. पोलीस अपार्टमेंटमधील सीसीटीव्ही फुटेजचीही तपासणी करत आहेत. पोलिसांनी मुलीची आणि तिच्या कुटुंबीयांचीही चौकशी केली आहे. हा निव्वळ अपघात होता की यामागे दुसरे काही कारण असू शकते, याचा तपास सुरू आहे.