
हरिओम व्हॅली परिसरात राहणाऱ्या ४० वर्षीय डॉक्टरने घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
सचिन सातपुते असे त्यांचे नाव असून आत्महत्येमागील नेमके कारण समजू शकले नाही. मात्र त्यांच्या आत्महत्येने टिटवाळ्यात हळहळ व्यक्त होत आहे.
डॉ. सचिन सातपुते यांचा गेली अनेक वर्षे ‘हिमालय क्लिनीक’ या नावाने दवाखाना होता. कोरोनाच्या काळात त्यांनी अनेक गोरगरीब रुग्णांना वैद्यकीय मदत केली होती. त्यामुळे त्यांच्याबद्दल रहिवाशांमध्ये आपुल कीची भावना निर्माण झाली होती. आज सकाळी दहाच्या सुमारास घरी त्यांचा मृतदेह आढळून आला. त्यांच्या कुटुंबियांबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही. मात्र सातपुते यांचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेऊन तो कल्याणच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. त्याचा अहवाल आल्यानंतरच आत्महत्येमागील कारण स्पष्ट होणार आहे.


























































