20 जुलैपासून बारावीची प्रात्यक्षिक, तोंडी परीक्षा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जुलै–ऑगस्टमध्ये होणाऱ्या बारावीच्या फेरपरीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापन परीक्षा 20 जुलैपासून सुरू होणार आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमाची प्रात्यक्षिक परीक्षाही याचदरम्यान सुरू होणार आहे. या परीक्षा 8 ऑगस्टमध्ये सुरू राहणार आहेत. पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक परीक्षेला बसणे आवश्यक असून कोणत्याही परिस्थितीत पूर्वीच्या परीक्षेतील गुण ग्राह्य धरले जाणार नाहीत, अशा स्पष्ट सूचना राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जारी केल्या आहेत.