
महाराष्ट्र कॅरम असोसिएशन व मुंबई उपनगर जिल्हा कॅरम संघटनेच्या मान्यतेने चेंबूर जिमखाना आयोजित केलेल्या पाचव्या राज्य मानांकन कॅरम स्पर्धेला चेंबूर जिमखाना येथे दिमाखात सुरुवात झाली. पुरुष एकेरीने सुरू झालेल्या या स्पर्धेच्या पहिल्या फेरीत मुंबईच्या भूषण पाटीलने अक्षय खराडेवर तीन सेटपर्यंत रंगलेल्या लढतीत 9-13, 25-8 व 19-16 अशी मात करत आगेकूच केली.
पुरुष एकेरी पहिल्या फेरीचे अन्य निकाल
लियाकत नागरजी (मुंबई) विजयी वि. सचिन गडकर (मुंबई उपनगर) 25-0, 25-0
चेतन कालन (रायगड) विजयी वि. शिरीष पेंढारकर (मुंबई उपनगर) 20-8, 25-0
शाहरुख खान (मुंबई उपनगर) विजयी वि. वैभव कोरगावकर (ठाणे) 21-8, 23-8
मनोज बायकर (मुंबई) विजयी वि. दयानंद देसाई (पुणे) 25-12, 25-0; भारत दांडेकर (मुंबई) विजयी वि. महेश खंडेलवाल (मुंबई उपनगर) 25-1, 25-11; जयसिंग चारानिया (मुंबई) विजयी वि. रजत रांगडे (मुंबई उपनगर) 25-4, 25-0; निखिल कोशिमकर (रायगड) विजयी वि. सुरभा ओटावकर (मुंबई) 20-19, 25-3.


























































