
सामना प्रतिनिधी । कॅलिफोर्निया
अमेरिकेच्या कॅलिफोर्नियातील जंगलाला लागलेल्या भीषण आगीमध्ये नऊ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. जोरदार वारे वाहत असल्याने ही आग पसरत असून आतापर्यंत 70 एकरचे जंगल आगीत भस्मसात झाले आहे. आगीमुळे सेक्रेमेंटो आणि सियरा नेवादा टेकडीखालील सुमारे 80 हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.
जंगलात लागलेल्या आगीमध्ये शेकडो घरे, रेस्टॉरंटस् आणि वाहने जळून खाक झाली आहेत. अग्निशमन दलाचे 2200 जवान आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. एक लाखाहून अधिक नागरिकांना आगीतून सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे.
कॅलिफोर्नियात भीषण अग्नितांडव, 9 जणांचा मृत्यू, 80 हजार नागरिकांचे स्थलांतर
कॅलिफोर्नियातील मलीबू रिसॉर्टपर्यंत आग पसरली आहे. हॉलीवूड कलाकारांचे हे आवडते रिसॉर्ट आहे. याशिवाय मलीबू येथे ब्रॅड पिट, हॅले बेरी, जेनिफर ऑनिस्टन, लिओनार्डो डिकेप्रियो, जॅक निकलसन यांच्यासारख्या प्रसिद्ध कलाकारांची आलिशान घरेही आहेत. त्यांना तातडीने घरे रिकामी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.




























































