आगामी साहित्य संमेलन वर्ध्यात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आगामी 96 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन वर्धा येथे जानेवारीमध्ये होणार आहे. साहित्य महामंडळाच्या स्थळ निवड समितीने शनिवारी वर्धा येथे भेट देऊन पाहणी केली. रविवारी होणाऱया महामंडळाच्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब होणार आहे.

विदर्भ साहित्य संघाचे शताब्दी वर्ष आहे. हे औचित्य साधून आगामी संमेलनाचे आयोजन करण्याचा बहुमान विदर्भ साहित्य संघाला देण्याचा निर्णय झाला आहे.
स्थळ निवड समितीने केवळ वर्धा या एकमेव स्थळाला भेट दिली आहे. महामंडळाच्या रविवारी होणाऱया बैठकीत आगामी संमेलन स्थळाची घोषणा करण्यात येईल, अशी माहिती महामंडळाचे सदस्य आणि मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी दिली.