
सामना प्रतिनिधी । सिंधुदुर्ग
ऑनलाईन औषध विक्री ही समाज हिताची नसून त्याचे अनेक दुष्परिणाम आहेत. त्यामुळे केंद्र शासनाने ऑनलाईन विक्री बाबत प्रस्तावित केलेला अधिसूचनेचा मसूदा रद्द करावा, अशी मागणी सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट केमिस्ट ड्रगिस्ट असोसिएशनने जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे आणि जिल्हा औषध प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे.
सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट केमिस्ट ड्रगिस्ट असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष आनंद रासम यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील औषध विक्रेत्यांनी जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे आणि औषध प्रशासनाला निवेदन सादर केले. यावेळी संघटनेचे सचिव संजय सावंत, प्रसाद तेर्से, विवेक आपटे, प्रवीण नाईक, दयानंद उबाळे, प्रवीण जोग, बाळासाहेब डोरले, सुभाष कांदळगावकर आदी औषध विक्रेते उपस्थित होते.

































































