पंचवटी एक्सप्रेसचे डब्बे सुटले, मध्य रेल्वेची वाहतूक खोळंबली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
panchavati express coupling issue

सामना प्रतिनिधी । कल्याण

मध्य रेल्वेच्या मागे लागलेले शुक्लकाष्ठ संपण्याची चिन्हे नाहीत. गुरुवारी सकाळी याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला. मध्य रेल्वेच्या कल्याण-ठाकुर्ली रेल्वे स्थानकांदरम्यान मुंबईच्या दिशेने येणाऱ्या पंचवटी एक्सप्रेसचे कपलिंग तुटल्याने 3 डबे मागेच राहिले. यामुळे मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर त्याचा परिणाम झाला आहे. मध्य रेल्वेच्या गाड्यांची वाहतूक काही काळ बंद होती. यामुळे अनेक प्रवाशांनी पायपीट करत गंतव्यस्थान गाठले. तर काही वेळात ही वाहतूक सुरू करण्यात आली आहे. असे असले तरी वेळापत्रक मात्र बिघडले असल्याचे कळते.