
देशभरात आज धुळवड साजरी होत आहे. या दिवशी वापरण्यात आलेल्या केमिकलयुक्त रंगांमुळे त्वचा आणि केसांचे नुकसान होऊ शकते. काही वेळा या रंगांमुळे त्वचेला खाज येणे, पुरळ येणे तसेच केसांना लागलेला रंग सहजरित्या न निघणे अशा प्रकारचे नुकसान टाळण्याकरिता काही नैसर्गित तेलाचा वापर करणे फायदेशीर ठरते.
खोबरेल तेलाचा वापर जसा काही पदार्थांची चव वाढवण्याकरिता केला जातो त्याचप्रमाणे त्वचा आणि केसांच्या आरोग्याकरिता खोबरेल तेल अतिशय गुणकारी आहे. या तेला जीवनसत्त्व आणि फॅटी असिड असते. ज्यामुळे त्वचा आणि केसांचे पोषण होते. रंगपंचमीच्या दिवशी त्वचेला लागलेला रंग सहजरित्या निघत नसेल किंवा रंगामुळे त्वचेला खाज येत असेल तर खोबरेल तेल लावल्याने त्वचेवरील खाज कमी होते.
रंग खेळण्यापूर्वीही चेहरा, मान, हात अशा शरीराच्या उघड्या भागांवर खोबरेल तेल लावा. नंतर रंग खेळायला घराबाहेर पडा.
ऑलिव्ह आईलमध्ये अँण्टी ऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतात. यामुळे त्वचा आणि केसांचे पोषण होते. या तेलाचे वैशिष्ट्य म्हणजे उन्हापासून रक्षण करण्याची क्षमता या तेलात असते. त्यामुळे रंग खेळण्यापूर्वी आणि रंग खेळल्यानंतर या तेलाने त्वचेला आणि केसांना मसाज करावा. जेणेकरून रंगाचे दुष्परिणाम टाळता येतील.
सूर्यफुलाचे तेल आरोग्यवर्धक असून ते सौंदर्यवर्धक आहे. सौंदर्यवाढीसाठी या तेलाचा वापर केला जातो. त्वचा आणि केस मुलायम राहतात. त्यांना नैसर्गिक सौंदर्य प्राप्त होते. त्वचेमध्ये ते सहजरित्या शोषून घेतले जाते. सौंदर्यप्रसाधनांमध्ये या तेलाचा वापर केला जातो. याकरिता त्वचेचे नुकसान टाळण्यासाठी या तेलाचा वापर करावा.




























































