नरेंद्र मोदींचा ‘चौकीदार चोर है’ असा उल्लेख, राहुल गांधींना हायकोर्टाने दिलेला दिलासा 28 जुलैपर्यंत कायम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केंद्र सरकारच्या राफेल विमान खरेदी व्यवहारावरून राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्देशून ‘चौकीदार चोर है’ असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. या प्रकरणी भाजप कार्यकर्त्यांनी त्यांच्या विरोधात अब्रुनुकसानीचा दावा ठोकत गिरगाव दंडाधिकारी कोर्टात खटला दाखल केला आहे.

या प्रकरणी दाखल केलेली तक्रार रद्द करण्यात यावी, म्हणून राहुल गांधी यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली असून त्यांना न्यायालयाने दिलेला दिलासा न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांनी 28 जुलैपर्यंत कायम ठेवला आहे. तसेच गिरगाव दंडाधिकारी कोर्टाला या प्रकरणावरील सुनावणी स्थगित करण्याचे आदेश दिले आहेत.

मोदी चीनला घाबरतात हेच सत्य, राहुल गांधी यांचा निशाणा

हिंदुस्थानच्या हद्दीत चीनची वाढती घुसखोरी आणि पंतप्रधानांचे नरेंद्र मोदींचे मौन हे देशासाठी घातक आहे. मोदी चिनला घाबरतात हेच सत्य, असे म्हणत कॉँग्रेस नेते राहुल गांधी यांनी हिंदुस्थानातील चीनच्या वाढत्या घुसखोरीवरून पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे.

चीन हिंदुस्थानच्या हद्दीत सातत्याने घुसखोरी करत आहे. हे पंतप्रधान मोदींना माहित आहे, पण तरीही ते गप्प आहेत. कारण मोदी चीनला घाबरतात. त्यामुळे ते जनतेपासून सत्य लपवतात आणि फक्त स्वतःची प्रतिमा जतन करत, असल्याचे राहुल गांधी यांनी ट्विट करत म्हटले आहे. लष्कराचे मनोधैर्य खच्ची करत देशाच्या सुरक्षेशी खेळत असल्याचा आरोपही त्यांनी मोदींवर केला आहे.