
दहिहंडीवेळी वरच्या थरावरून कोसळून दोन्ही पाय निकामी झालेल्या परळचा प्रथमेश सावंत या जखमी गोविंदाचा आज रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला. तब्बल दीड महिना तो केईम रुग्णालयात मृत्युशी झुंज देत होता. अखेर शनिवारी त्याची प्राणज्योत मालवली.
दडीहंडीच्या वेळी थर लावताना प्रथमेश मधल्या थरावर होता. मात्र वरच्या थरातील गोविंदा त्याच्या अंगावर पडला व ते दोघे जमिनीवर आपटले. या अपघातात प्रथमेशच्या मणक्याला दुखापत झाली होती. त्याचा कमरेखालचा भाग निकामी पडल्यासारखा झाला होता. गेल्या दीड महिन्यापासून त्याच्यावर केईएम रुग्णालयात उपचार सुरू होते.
प्रथमेशच्या मृत्युमुळे यंदाच्या दहिहंडी उत्सवात जखमी होऊन मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या दोनवर पोहोचली आहे. याआधीसंदेश दळवी या 22 वर्षीय गोविंदाचा नानावटी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. दहीहंडीवरून पडून जखमी झाल्याने त्याला उपचारासाठी नानावटीमध्ये दाखल करण्यात आले होते. संदेश हा विलेपार्ले पूर्वेकडील शिवशंभो गोविंदा पथकातून दहीहंडी फोडण्यासाठी गेला होता. चकाला बामनवाडा येथे दहीहंडीच्या सातव्या थरावरून खाली कोसळून तो जखमी झाला होता
































































