थोडय़ा दिवसांचा खेळ,घटनाबाह्य सरकार कोसळणार- आदित्य ठाकरे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाविकास आघाडी सरकारच्या अडीच वर्षांच्या काळात हजारो कोटींच्या गुंतवणुकी महाराष्ट्रात आल्या. कुठल्याही दंगली, भेदभाव नव्हता. मात्र गेल्या दहा महिन्यांच्या काळात महाराष्ट्र अंधारात गेला आहे. महाराष्ट्रात समाजात भेदभाव, द्वेष पसरवण्याचे काम सुरू आहे. अवकाळी पाऊस, गारपीटीमुळे शेतकरी संकटात आहे. मात्र त्यांना मदत मिळत नाही. त्यामुळे अशा घटनाबाह्य बिनकामी सरकारचा थोडय़ाच दिवसांचा खेळ बाकी, असून सरकार कोसळणार असल्याचा विश्वास शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला.

मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचं आणि महाराष्ट्राला दिल्लीसमोर झुकवायचा प्रयत्न सरकारकडून केला जात आहे. मात्र हा महाराष्ट्र मोडेल, पण दिल्लीसमोर कधी झुकला नाही आणि झुकणारही नाही, असेही आदित्य ठाकरे म्हणाले. खरं तर 1 मे महाराष्ट्राप्रमाणे गुजरातचा स्थापना दिवस. अशा वेळी गुजरातच्या कुंडलीत भरभरून देतो, मात्र महाराष्ट्रातील तरुणांना रोजगार देणारे प्रकल्प गुजरातला पळवले, जातात असा टोलाही त्यांनी लगावला. शिवसेनेला मुंबईकरांनी सलग 25 वर्षे सत्ता दिली. त्यामुळे नियोजनबद्ध काम केल्याने 90 हजार कोटींच्या ठेवी जमा झाल्या आहेत. यावर ठेवींवर डोळा असल्यानेच भाजप, मिंध्यांना मुंबई महानगरपालिकेची सत्ता हवी आहे, असा घणाघातही त्यांनी केला.